तुझ्या सयीचा पाऊस,
माझ्या अंगनात येतो,
चिंब चिंब भिजतांना,
झोके फांदीवर घेतो.।
कधी झाली होती भेट,
झाडाआडोशाच्या खुणा,
हातावरी हात होते,
रान सुगीतले पुन्हा.।
माझ्या आळीबोळीतुन,
तुझे असे येणे-जाणे,
कधी ऐकले गावाने,
माझ्या कवितेचे गाणें।
आता हुरहुर सांज,
दूर धुके दाटलेले,
माझ्या डोळ्यामध्ये सखे,
तुझे रूप साठलेले.।
No comments:
Post a Comment